आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडणाच्या रागातून कृत्य:प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून दीड वर्षीय मुलाचे अपहरण, पुण्यातील घटना

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भांडणाच्या रागातून प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी बेड्या घातल्या. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपीचा लातूरपर्यंत पाठलाग करून १२ तासांत चिमुरड्याची सुटका केली. सुनील सोपान पांढरे (२६ रा. पांढरेवाडी, ता. गंगाखेड, जि.परभणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला आणि सुनील यांची बारामतीमध्ये कंपनीत काम करीत असताना ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. महिलेला पतीपासून दीड वर्षाचा मुलगा असून दोघे सोबत राहत नाही. काही दिवसांपूर्वी सुनीलने प्रेयसीला तिच्या मुलासह बारामतीहून पुण्यामध्ये फिरण्यास आणले होते. ते बालाजीनगरमधील लॉजमध्ये राहून पुण्यात ठिकठिकाणी फिरत होते. दोन दिवसांपूर्वी (३ मे) दोघांमध्ये किरकोळ कारणामुळे वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे सुनीलने प्रेयसीला मारहाण करून खोलीत कोंडून ठेवत मुलाचे अपहरण केले. प्रेयसीने आरडाओरड केल्यानंतर लॉज व्यवस्थापकाने तिची सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...