आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानगव्यांनी पुणेकरांना दर्शन दिले:पुण्यामध्ये किट्टू-अविका गव्यांची जोडी वावरणार

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिन्यांपूर्वी कात्रज आणि कोथरूड परिसरात रानगव्यांनी पुणेकरांना दर्शन देत घाबरवून सोडले होते. पण पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात आता केरळच्या तिरुवनंतपुरम येथून दाखल झालेली किट्टू-अविका गव्यांची जोडी मात्र दिमाखाने वावरणार आहे. गव्यांच्या जोडीसोबत तरसांची जोडीदेखील प्राणिसंग्रहालयात विहार करताना प्राणिप्रेमींना पाहता येणार आहे. नुकतेच हे चारही पाहुणे कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात दाखल झाले असल्याची माहिती राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी दिली.

गवा आणि तरस यांच्या जोड्या तिरुवनंतपुरम येथून मोठा प्रवास करून पुण्यात दाखल झाल्या आहेत. गव्याची मादी सुमारे ६ वर्षांची आहे, तर दुसरा नर गवा दोन वर्षांचा आहे. प्राणिसंग्रहालयात नर गवा आधीपासूनच आहे. त्याच्या जोडीला आता दोन गवे दाखल झाले आहेत. जुन्या गव्याने या नव्या मित्रांचा स्वीकार केला आहे. गव्यांसाठी सुमारे सहा हजार स्क्वेअर मीटर परिसर राखीव असून तो खंदकाने वेढला आहे. तरसाच्या जोडीला अद्याप खंदकात सोडण्यात आलेले नाही. लवकरच त्यांना खंदकात सोडले जाईल. त्यांच्यासाठीच्या खंदकाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांच्यासाठी सुमारे दीड हजार स्क्वेअर मीटरचा खंदक तयार केला आहे. तरसाच्या जोडीचे वय दोन व तीन वर्षांचे आहे.

जाधव म्हणाले, ‘गेली दोन वर्षे प्राणिसंग्रहालये पूर्ण बंद होती. ती आता खुली झाली आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या देवाणघेवाणीला सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...