आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी मागितली लाच:1 लाख 10 हजार रुपये मागणारा पोलिस 10 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोणीकंद परिसरात अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाच मागून दहा हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलिस हवालदार शिरीष आप्पासाहेब कामठे यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शनिवारी (ता. 4) रंगेहाथ पकडले आहे.

पोलिस कॉन्स्टेबल शिरीष कामठे (वय - 36, रा. पुणे) यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 52 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये दुसऱ्या व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. तक्रारदार यांच्या जागेत सुरु असलेले अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे याने एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता कामठे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कामठे याने एक लाख दहा हजार रुपये मागणी करुन त्यातील 10 हजार रुपये स्विकारताना पुणे एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार , पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...