आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:खासगी बांधकाम व्यावसायिकाने घरे न देता केली म्हाडाची 4  कोटींची फसवणूक

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात घरे उपलब्ध व्हावीत, याकरिता म्हाडाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. यासाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने म्हाडा शहराच्या वेगवेगळ्या भागांत प्रकल्प पूर्णत्वास नेत असते. मात्र, पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने म्हाडाने दिलेल्या मुदतीत घरे बांधून न देता ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यावसायिकाने सुमारे ४ कोटी रुपयांची शासनाची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज येवला (रा. स्नेहल रेसिडेन्सी, चिंचवड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. म्हाडाचे व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...