आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:सराईत गुंडाच्या अंत्यविधीला निघाली 125 दुचाकींची रॅली

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी गुंड माधव वाघाटे याचा खून

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करत सराईत गुंडाच्या अंत्यविधीला तब्बल १०० ते १२५ दुचाकींची रॅली काढण्यात आल्याचा प्रकार धनकवडी ते कात्रज स्मशानभूमी परिसरात घडला. याप्रकरणी १५० ते २०० जणांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र वेंजळे यांनी फिर्याद दिली आहे. माधव हनुमंत वाघाटे या सराईत गुंडाच्या अंत्यविधीला ही दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुंड माधव वाघाटे याचा खून करण्यात आला. शनिवारी त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे १०० ते १२५ जणांनी दुचाकीवरून रॅली काढली. टोळक्याने बालाजीनगर ते धनकवडी, कात्रज स्मशानभूमीपर्यंत विनापरवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...