आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील खडकी बाजार परिसरात सराईतांचा राडा:दोन्ही गटातील 11 जणांना अटक; नागरिकांमध्ये दशहत

पुणे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या भांडणाच्या रागातून दोन सराईत गटामध्ये जोरदार राडा झाल्याची घटना 23 सप्टेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गटातील 11 जणांना अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

शुभम बाळकृष्ण उमाळे (वय 23), दीपक राजेंद्र डोके (वय 26), हितेश उर्फ बापू सतीश चांदणे (वय 22), प्रज्योत उर्फ मोन्या बाळकृष्ण उमाळे (वय 21), आकाश उर्फ आकु संजय वाघमारे (वय 22), सलमान नासिर शेख (वय 25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रब्बील शेख (वय 21) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मारहाण गंभीर जखमी

रब्बील आणि त्यांचा मित्र 23 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून खडकीकडे निघाले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी रब्बीलवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेलेल त्यांचे मित्र सुदर्शन अडसूळ, मझहर शेख, रफिक रब्बानी, आकिब खान, प्रतीक सपकाळ यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम याबाबत पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांमध्ये दशहत

शुभम उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रब्बील रज्जाक शेख (वय 31), शहबाज सलीम शेख (वय 18), रब्बीन रफिक शेख (वय 25), प्रतिक सचिन सपकाळ (वय 24), मुस्तफा जहीर खान (वय 25) यांना अटक केली आहे. किरण खुडे, दीपक डोके, मोन्या उमाळे, हितेश उर्फ बापू चांदणे, सलमान नासिर शेख, आकाश उर्फ अक्कू वाघमारे अशी जखमींची नावे आहेत. आरोपींनी हातात शस्त्रास्त्रे घेउन परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजविली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस अधिक तपास करत आहे.