आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खद:पुण्यात वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकाचे कर्करोगाने निधन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती विवेक देसाई (५०) यांचे रविवारी रात्री कर्करोगाने निधन झाले आहे. सोमवारी बिबवेवाडी येथील सिद्धीनगरी, विद्यासागर सोसायटी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वाती देसाई या मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गणेशवाडीच्या रहिवासी हाेत्या. त्यांनी जवळपास २५ हून अधिक वर्षे महाराष्ट्र पोलिस दलात विविध पदांवर सेवा केली आहे.

त्यांनी काही काळ सीआयडी, सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले होते. गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग, सहकारनगर ठाण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. पुणे पोलिस आयुक्त कार्यालयातील विशेष शाखेत सहा महिन्यांपूर्वी बदली झाली होती. यादरम्यान त्यांचे कर्करोगावरील उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...