आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाही बस पेटली:शिवशाही बसने अचानक रस्त्यावर पेट घेतला; 42 प्रवासी सुखरूप

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ ते पुणे प्रवास करत असलेली राज्य परिवहन विभागाची शिवशाही बस मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील येरवडा परिसरात आली असताना बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. त्यानंतर सदर रस्त्यावरील वाहतूक पाेलिसांनी थांबवत अग्निशमन दलाच्या गाडीस घटनास्थळी बाेलवल्यानंतर जवनांनी तत्काळ आग आटाेक्यात आणली आहे.

या घटनेत सुदैवाने ४२ प्रवासी वेळेत गाडी बाहेर पडल्याने सुखरूपरीत्या बचावले आहेत. शिवशाही बस (एमएच ०६ डी डब्ल्यू ०३१७) ही सोमवारी रात्री यवतमाळ येथून पुण्याच्या दिशेने येण्यास निघालेली हाेती. यवतमाळ-आैरंगाबाद-पुणे असा प्रवास करत ती येरवडा येथील शास्त्रीनगर परिसरात गलांडे हाॅस्पिटल जवळ मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोेहोचली. शिवाजीनगर बसस्थानकाकडे निघालेल्या बसमधून धूर निघत असल्याचे दिसताच चालकाने रस्त्याच्या बाजूला बस घेऊन प्रवाशांना गाडीच्या खाली उतरवले. यादरम्यान अचानक बसने पेट घेतला. आग आटाेक्यात येईपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली.

बातम्या आणखी आहेत...