आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A Special Exhibition At The Tata Central Archives In Pune Focuses On The Amrit Mahotsav Of Freedom And The Contribution Of The Tata Group

टाटा सेंट्रल अर्काइव्जमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि टाटा समूहाचे योगदानावर भर

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ टाटा सेंट्रल अर्काइव्जने एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. भारताचे स्वातंत्र्य आणि टाटा समूहाची भूमिका यावर हे प्रदर्शन आधारित आहे.

'टाटा-भारत वाटचाल' या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमधून उलगडण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व वसाहतकाळ, स्वातंत्र्योत्तर काळातील एकत्रीकरण व दृढीकरण आणि उदारीकरणानंतरचे विस्ताराचे युग असे वेगवेगळे टप्पे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या काळांमध्ये टाटा समूहाने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कंपन्या, पार केलेले अनेक टप्पे आणि त्यातून देशाच्या जडणघडणीत व प्रगतीमध्ये देण्यात आलेले योगदान असा संपूर्ण प्रवास याठिकाणी पाहता येईल. क्रीडा व लोकोपकारी उपक्रमांमध्ये टाटा समूहाने दिलेल्या लक्षणीय योगदानाची माहिती देखील या प्रदर्शनामध्ये घेता येईल.

टाटा समूहाने भारताच्या विकासात दिलेले अतुलनीय योगदान दर्शवणारी अनेक छायाचित्रे, पत्रे आणि इतर अनेक रोचक, माहितीपूर्ण कागदपत्रे प्रत्येक विभागामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत. टाटा सेंट्रल अर्काइव्जने विशेष तयार केलेल्या या प्रदर्शनाला भेट देऊन भारताचा आगळावेगळा इतिहास जाणून घेण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे.

प्रदर्शन स्थळ आणि वेळा अशा आहेत

सोमवार 12 सप्टेंबरपासून शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

ठिकाण: टाटा सेंट्रल अर्काइव्ज, 1, मंगलदास रोड, पुणे

टाटा उद्योगसमूह आणि देशाच्या विकासाचे विविध टप्पे, यांच्यात एक नाते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या टप्प्यापर्यंतचा दीर्घ काळ टाटा समूहाचा ठसा विविध क्षेत्रात उमटला आहे. केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर संस्कृती, कला, आरोग्य, विज्ञान संशोधन, क्रीडा, समाजभान अशा अनेक क्षेत्रात टाटा समूहाने वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिले आहे. या साऱ्या घटकांची एकत्रित दखल या प्रदर्शनात घेण्यात आली आहे. एक उद्योगसमूह आपल्या सामाजिक बांधिलकीचे आदर्श किती क्षेत्रात निर्माण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण या प्रदर्शनात दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...