आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थीनींशी अश्लील चाळे करणारा शिक्षक जेरबंद:आधीही होत्या तक्रारी, पोलिसांकडून अटक, पोलिस कोठडीतही रवानगी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनींशी अश्लील चाळे करणाऱ्या एका शिक्षकाला पाेलिसांनी अटक केली. दादासाहेब खरात असे अटक केलेल्या संशयित शिक्षकाचे नाव आहे.

सहावीच्या वर्गातील एका मुलीने बुधवारी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर संबंधित शिक्षका विराेधात पालकांनी गुरुवारी तक्रार दिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे, अशी माहिती पाेलीसांनी शुक्रवारी दिली.

संशयित आराेपी शिक्षक दादासाहेब अंकुश खरात (वय 42) याच्याविराेधात यापूर्वीही विद्यार्थीनींकडून तक्रारी येऊनही त्यास शाळेचे मुख्याध्यापिका व गट विकास अधिकारी यांनी पाठीशी घातल्याचा आराेप मुलींच्या पालकांकडून करण्यात येत आहे. या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत भिग्वणमधील लोकप्रतिनिधी आणि पालकांनी शाळेत जावून जाब विचारत दोषी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी शाळेत जाऊन घटनेची सखोल माहिती घेतली आहे.

दादासाहेब खरात हा भिगवण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीच्या वर्गात वर्गशिक्षक म्हणून काम करताे. वर्गातील विद्यार्थीनीशी ताे अश्लील चाळे करीत असल्याचा प्रकार घडत हाेता. याबाबत पाच महिन्यापूर्वी असाच एक प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेच्या वतीने त्याच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी केवळ माफीनामा लिहून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

एका अल्पवयीन मुलीचा त्याने विनयभंग केल्यानंतर तिने संबंधित प्रकार शाळेतून घरी गेल्यानंतर पालकांना सांगितला. त्यानंतर पिडित मुलीच्या आईने थेट भिगवण पाेलीस ठाणे गाठत आराेपी शिक्षका विराेधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाेलीसांनी आराेपी शिक्षक दादासाहेब खरात याच्या विराेधात विनयभंग व पाेस्काे कलमानुसार गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली. त्यास न्यायालयात दाखल केले असता त्याला पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक दिलीप पवार करत आहे.

बातम्या आणखी आहेत...