आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A Terrible Accident Involving 48 Vehicles At The Same Time In Pune The Vehicles Collided On Navale Bridge Due To Brake Failure Of The Truck, 10 People Were Injured In The Accident

पुण्यात एकाचवेळी 48 वाहनांचा भीषण अपघात:नवले ब्रिजवर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने धडकली वाहने, दुर्घटनेत 10 जण जखमी

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. रविवारी रात्री बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात टंँकर चालकाचे नियंत्रण सुटले. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे कळते. टँकरच्या धडकेने तब्बल 48 वाहनांचे नुकसान झाले असून काही वाहन चालक जखमी झाले आहेत.

उताराने टॅंकर चालकाचे नियंत्रण सुटले

नवले पुलाजवळ तीव्र उतारावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटले. टँकरच्या धडक दिल्यानंतर वाहने आदळली. अपघातात 48 वाहनांचे नुकसान झाले. वाहनात चालक अडकल्याची माहिती मिळाली. टँकरने पाठीमागून धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळल्याने परिसरात गोंधळ उडाला.

अपघातस्थळी रस्त्यावर अपघातग्रस्त अवस्थेतील वाहन.
अपघातस्थळी रस्त्यावर अपघातग्रस्त अवस्थेतील वाहन.

घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले

या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या रेक्स्यु व्हॅन तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु करण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जवानांनी मोटारीत अडकलेल्या चालकासह प्रवाशांना बाहेर काढले.
जवानांनी मोटारीत अडकलेल्या चालकासह प्रवाशांना बाहेर काढले.

चालक, प्रवाशांना बाहेर काढले

या दुर्घटनेनंतर अनेक वाहनांचे चालक जखमी झाले तसेच काही प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या जखमींसह वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातात 48 वाहनांचे नुकसान झाले असून 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे अग्निशमन दलाने दिली.

अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना सहकार्य करताना नागरिक.
अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना सहकार्य करताना नागरिक.

शुक्रवारी (19 नोव्हेंबर) बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ भरधाव मोटारीने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. अपघातात चार वर्षांच्या बालकासह तिघे जण जखमी झाले होते.

भीषण अपघाताचे काही फोटो

अपघातानंतर पुण्यातील नवले पुलावरील दृष्य.
अपघातानंतर पुण्यातील नवले पुलावरील दृष्य.
अपघातग्रस्त वाहनाचे झालेले नुकसान.
अपघातग्रस्त वाहनाचे झालेले नुकसान.
अपघातानंतर रस्त्याच्या कडेला पडलेली कार.
अपघातानंतर रस्त्याच्या कडेला पडलेली कार.
पाठोपाठ धडकल्यामुळे या वाहनाचे मागच्या बाजून झालेले नुकसान.
पाठोपाठ धडकल्यामुळे या वाहनाचे मागच्या बाजून झालेले नुकसान.
बातम्या आणखी आहेत...