आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेईंग गेस्टच्या रुपात चोर:रूममेटचे लॅपटाॅप, माेबाईल फाेन चाेरणारा भामटा जेरबंद, आरोपीस नागपुरात अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात भाडयाच्या खाेलीत पेईंग गेस्ट म्हणून राहून रुममेट असलेल्या मुलांचे लॅपटाॅप, माेबाईल फाेन चाेरणाऱ्या एका भामटयास भारतीय विद्यापीठ पाेलीस ठाण्याच्या पाेलीस पथकाने नागपूर येथून अटक केली आहे. अनुराग राजेश ठाकूर (वय २०, रा.नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे अशी माहिती भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

पाेलिसांनी आराेपी अनुराग ठाकूर याच्या ताब्यातून एक लॅपटाॅप, एक माेबाईल असा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 28 जून राेजी रात्री एक ते सकाळी पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान भारती विद्यापीठ परिसरातील सिक्स पाॅकेट बि्लडींग मध्ये राहणाऱ्या हरीश काळे (वय 23) या मुलाचा व त्याच्या मित्रांचा एक लॅपटाॅप व दाेन माेबाईल फाेन चाेरीस गेले हाेते. ही चाेरी ही अनुराग ठाकूर याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विराेधात पाेलिस ठाण्यात हरिश काळे याने तक्रार दाखल केली हाेती.

तांत्रिक विश्लेषण

त्याचा शाेध पाेलीस अधिकारी धिरज गुप्ता यंचे पथक करत हाेते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन शाेध घेत असताना, पाेलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धाेत्रे, राहूल तांबे यांना आराेपी नागपूर मध्ये ट्रीलीयम माॅल येथील एजंट जॅकबार मध्ये कामास अ्सल्याची माहिती मिळाली.

इतरही ठिकाणी गुन्हे

त्यानुसार आराेपीचा शाेध घेण्याकरिता पाेलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, अभिजीत जाधव, सचिन गाडे यांचे पथक नागपूरला रवाना झाले हाेते. त्यांनी आराेपी अनुराग ठाकूर याचा शाेध घेऊन त्यास जेरबंद केले आहे. त्याच्याकडील पाेलिस चाैकशी दरम्यान त्याने अशाचप्रकारे पुण्यातील काेथरुड पाेलिस स्टेशन, भारती विद्यापीठ पाेलीस स्टेशन व सिंहगड राेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

मागील सहा महिन्यापासून पेईंग गेस्ट म्हणून राहून रुममेटचे लॅपटाॅप, माेबाईल, फाेन, पैसे चाेरी केल्याचे आणि मार्केटयार्ड पाेलीस स्टेशन हद्दीतील डॉमिनाेज पिझ्झा मध्ये काम करुन त्याठिकाणचेही पैसे चाेरल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले आहे.याबाबत आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

आणखीन गुन्हे उघडकीस

ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभाग अपर पाेलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पाेलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पाेलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पाेलिस निरीक्षक संगीता यादव, पाेलीस निरीक्षक विजय पुराणिक, पाेलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पाेलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, हर्षल शिंदे, तुळशीराम टेंभुर्णे, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, धनाजी धाेत्रे, राहूल तांबे, सचिन गाडे, अवधूत जमदाडे, मंगेश बाेरडे यांच्या पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...