आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर नामुष्की:शिरूर पोलिस ठाण्यातून आरोपी पळाला; लॉकअपची कौले काढून सराईत चोरट्याने ठोकली धूम

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर रस्त्यावरील शिरुर पोलिस स्टेशनमध्ये शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील घरफोडी चोरीतील आरोपी शिरुर लॉकअपमध्ये ठेवला होता. बुधवारी पहाटेच्या वेळी लॉकअपमधील कौल उचकटून रेवण उर्फ बंटी बिरू सोनटक्के (वय 22, रा. वारजे माळवाडी पुणे) हा आरोपी पळून गेल्याची बाब उघडकीस आली आहे.

आरोपी रेवणसह त्याला पळून जाण्यास मदत करणारा अक्षय काळे (रा. चिंचोडी पाटील ता. जि. अहमदनगर) वर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शिरुर पोलिस स्टेशनमध्ये खळबळ उडाली असून, आरोपीची पथकांमार्फत शोधाशोध सुरु आहे.

पोलिसांवर नामुष्की

याबाबत माहिती अशी की, आरोपी रेवण हा पहाटेच्या वेळी पळून गेला असून, सकाळी सहा वाजता लॉकअप गार्डची ड्युडी बदलत असताना हा प्रकार उघडकीस आला. घरफोडी प्रकरणात अटक असलेला हा आरोपी काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद येथील कस्टडीमधून पळून गेला होता. हे सर्व माहिती असून आरोपीवर लक्ष न ठेवल्यामुळे पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्यावर इतरही अनेक गुन्हे दाखल आहे. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी पसार झाल्याने पोलिसांवर नामुष्की आली आहे. याबाबत शिरुर पोलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...