आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:पुण्यात फॅशनस्ट्रिट परिसरात व्यापार्‍यावर गोळीबार, लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गजबजलेला कॅम्प येथील फॅशनस्ट्रिट परिसरात व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने छर्‍याच्या बंदीकीतून गोळीबार केला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

या हल्ल्यात तौफिक अख्तर शेख (45, रा. भीमपुरा कॅम्प, पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जुल्फीकार शेख नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तौफिक शेख आणि जुल्फीकार शेख नावाचा व्यक्ती व्यापारी संघटनेचे संबंधीत आहेत. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादाचे पर्यवसन मोठ्या वादात झाले. मंगळवारी रात्री तौफिक शेख हा फॅशनस्ट्रिट परिसरातील एबीसी फार्म नावाच्या दुकानाजवळ आला असताना त्याचवेळी जुल्फीकार छर्‍यांची बंदुक घेऊन पोहचला. त्याने तौफिक यांच्यावर बंदुक रोखत गोळीबार केला. या गोळीबारात तौफिक हे जखमी झाले.

गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी रात्रीच्यावेळी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...