आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:रील्स बनवण्याच्या नादात धडक दिलेल्या सोलापूरच्या महिलेचा पुण्यात मृत्यू

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेशल मीडियासाठी रील्स बनवण्याच्या नादात दुचाकी चालकाने महिलेस धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दाेन तरुणांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. तस्लिमा फिराेज पठाण (मु.रा.बार्शी, साेलापूर, सध्या रा.देवाची उरळी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार जाेतिबा शंकर कुरळे (४७) यांनी आराेपीविराेधात वानवडी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून आयान शहानूर शेख व झाईद जावेद शेख (दाेघे रा.सय्यदनगर, हडपसर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार, दाेघे आरोपी साेशल मीडियासाठी व्हिडिओ रील्स बनवत हाेते. त्या वेळी आयान शेखने पल्सर मोटारसायकल (एमएच १२ एलक्यू ७९२१) ही अतिवेगाने चालवत तस्लिमा पठाण यांना धडक दिली.

बातम्या आणखी आहेत...