आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A Woman Lawyer Was Abused And Demanded Ransom Communicating In Obscene Language, A Case Against Five Members Of The Society In Kondhwa Police Station

महिला वकीलाला शिवीगाळ करत मागितली खंडणी:अश्लील भाषेत संवाद, सोसायटीच्या पाच जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोसायटी ही सहकार विभागाकडे रजिस्टर नसल्याने सोसायटीच्या कमिटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत वकील असलेल्या महिलांना विचारणा करून यासाठी कट करून अश्लिल भाषेत बोलून, विनयभंग, माारहाण, बदनामी तसेच खंडणीचा प्रकार करणार्‍या सोसायटीतील पाच जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात अखेर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसिम खान, सालेहा खान, भरत जाधव, नदीम सय्यद, अतिका सय्यद (सर्व रा. सन शाईन हिल्स 2 सोसायटी, पिसोळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 35 वर्षीय वकिल महिलेनी अ‍ॅड. साजिद शाह यांच्या मार्फत न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती.

अश्लील भाषेत संवाद

दाखल गुन्ह्याुनसार, फिर्यादी ह्या वकील आहेत. फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. फिर्यादी राहत असलेली सोसायटी ही सहकार विभागाकडे रजिस्टर नसल्याने सोसायटीच्या कमिटीचे आर्थिक गैरव्यवहाराबाबत फिर्यादी यांनी विचारणा करू नये म्हणून संशयीत आरोपींनी आपापसात संगणमत केले. सोसायटीच्या आवारामध्ये सोशल मिडीयाचे काही प्रतिनिधी सोसायटीच्या कामकाजाबाबत माहिती घेण्यासाठी आले अतसाना संशयीत आरोपींनी फिर्यादी यांना उद्देशून अश्लील भाषेत संवाद साधला. त्याच बरोबर त्यांच्या वकीली पेशालाही नावे ठेवली.

कोंढवा पोलिसांनी दाखल केला गुन्हा

फिर्यादी यांना आर्थिक व्यवहारात लक्ष घालु नका असे म्हणत त्यांच्या अंगावर धावुन गेले. तसेच पुढील आर्थिक वर्षाकरीता 30 हजार रूपये तीन दिवसात द्या नाहीतर तुमच्या घराचे नळ कनेक्शन आम्ही तोडू अशी नोटीस त्यांना दिली. तसेच फिर्यादीच्या पतीचा फोटो फेसबुकवर टाकून चोर असा उल्लेख करून बदनामी देखील केली. याप्रकरणी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मित्राकडून मैत्रिणीचा विनयभंग

स्वारगेट परीसरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणीला तिच्या मित्राने विश्वासाने स्वारगेट कॅनाल येथे 17 ऑगस्ट राेजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास बाेलवून घेतले. त्यानंतर तिला एका रिक्षात बसवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले अाहे. तरुणीने त्यास विराेध केला असता तिला हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने स्वारगेट पाेलीस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केल्यानंतर पाेलीसांनी अनिकेत बजरंग डाेळसे (वय-27, रा.स्वारगेट,पुणे) यास अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली.

बातम्या आणखी आहेत...