आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोयत्याने वार:जुन्या वादातून तरुणावर टोळक्याकडून कोयत्याने वार; अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादातून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धायरीत घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात प्रशांत सुरेश कांबळे (१८, रा. कुंभारचावडी, धायरी, पुणे) याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. प्रशांत या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. धायरीतील भैरवनाथ मंदिरासमोर मंगळवारी रात्री साडेसात वाजता घडली. माहितीनुसार, प्रशांत कांबळे, संविधान वंजारी, साहील सुपेकर आणि संतोष पासवान हे चौघे गप्पा मारत बसले होते. तेव्हा ही घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...