आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:लग्नात झालेल्या चेष्टामस्करीतून तरुणाला बेदम मारहाण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका लग्नात झालेल्या चेष्टामस्करीच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शेवाळेवाडी परिसरात घडला आहे. प्रीतम ऊर्फ सूरज गंगाराम पवार (२१, रा.हडपसर, पुणे) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पाेलिस ठाण्यात अथर्व साबळे व अभिषेक भाेसले (दाेघे रा.शेवाळेवाडी, पुणे) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम पवारचा मित्र अनिकेत फुटाणेच्या ३० ऑक्टाेबर राेजी झालेल्या लग्नात प्रीतम आणि अथर्व यांच्यात चेष्टमस्करीमध्ये बाचाबाची झाली. तो राग मनात धरून अथर्वने प्रीतमला कानाखाली मारली, लाकडी बांबूने त्याच्या डाेक्यात व पायावर वार करून जखमी केले. त्याला शिवीगाळ करून धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...