आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“तो माझी गर्लफ्रेंड फिरवतोय, तुम्ही त्याला बोलावून कानाखाली आवाज काढा,’ असे मित्राने सांगितल्याने टोळक्याने एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना ८ डिसेंबरला ( गुरुवारी ) संध्याकाळी तळजाई टेकडीजवळ घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अवघ्या ८ तासांमध्ये आरोपींना जेरबंद केले आहे.
साहिल चांगदेव कसबे (१९, रा. अपर डेपो, बिबवेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राज वाघमारे (रा. तळजाई वसाहत), डेब्या उर्फ तुषार आरणे (रा. तळजाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार करण उर्फ सोन्या वाघमारे पसार आहे. साहिल एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याची एका तरुणीशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. दोघांचे बाहेर फिरणे वाढले होते. ही बाब तरुणीच्या पहिल्या प्रियकराला समजली होती. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांना ही बाब सांगून संबंधित तरुणाला दम देण्याचे सांगितले होते असेही समोर आले आहे.
तरुणाने सांगितले होते त्याच्या कानाखाली आवाज काढा
तरुणीच्या पहिल्या प्रियकराने आरोपींना साहिल माझी गर्लफ्रेंड फिरवतोय, तुम्ही त्याला बोलावून घ्या आणि कानाखाली आवाज काढा, असे सांगितले. त्यानुसार संबंधिताने तिघांना साहिलचा फोटो पाठवला. गुरुवारी साहिल तळजाई परिसरातील सदु शिंदे मैदानाजवळ आला असता, तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर सराईत डेब्या उर्फ तुषार आरणे याने साहिलच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी सर्वांना इंदापूर येथून अटक केली.
साताऱ्यामध्ये पत्नीचा खून: चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना सातारा येथील मतकर कॉलनी येथे दि. ८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पती दिलीप वामन पवार, (६२, रा. मतकर कॉलनी, सातारा) याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर राहून आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.