आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:परळीच्या तरुणीची पुण्यात आत्महत्या, मुलगी आजारी असल्याचा कुटुंबीयांना दिला जबाब

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील महंमदवाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या तरुणीचे विदर्भातील एका मंत्र्यांशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असल्याने या आत्महत्येचे गूढ आणखी वाढले आहे. वानवडी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. पूजा चव्हाण (२२) असे तरुणीचे नाव आहे. महंमदवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पूजा रविवारी घरी होती. या वेळी तिच्यासोबत दोन जण होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिने आत्महत्या का केली अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी तरुणीच्या आई-वडिलांची चौकशी केली. त्यांनी ती आजाराने ग्रस्त असल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली आहे.

भाड्याच्या फ्लॅटमध्ये दोन मित्रांसाेबत राहत होती
मृत मुलगी काही दिवसांपूर्वीच तिच्या दोन मित्रांसह सोसायटीमध्ये राहण्यास आली होती. तिने सदनिका भाड्याने घेतली होती. यातील बेडरूम ती वापरत होती. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ती पदवीधारक असून इंग्लिशचा कोर्स करण्यासाठी आली होती. नम्रता पाटील, पोलिस उपायुक्त