आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात लग्नासाठी बळजबरी:कुंडलीत दोष असल्याने तरुणीचा लग्नास नकार, तरुणाकडून बदनामी करत जीवे मारण्याची धमकी

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शादी डाॅट काॅम या वेबसाईटवरुन आेळख झालेल्या एका तरुणाने तरुणीसाेबत बाेलणे करुन लग्न करण्याबाबत ठरवले. मात्र, सदर दाेघांची कुंडली पत्रिका गुरुजीकडे पाहिल्यानंतर, दाेघांचे कुंडलीत दाेष असल्याने तरुणीने तरुणा साेबत लग्नास नकार दिला. यामुळे चिडलेल्या तरुणाने तिच्याकडे लैंगिक गाेष्टीची मागणी करुन तिला जीवे मारण्याची धमकी देत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत आरोपीवर मंगळवारी वू हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय पिडित तरुणीने चिखली पाेलीस ठाण्यात आराेपी कुणाल सिंग (रा.मुंबई) याच्या विराेधात फिर्याद दाखल केली आहे. सदर तरुणी उच्चशिक्षित असून खासगी कंपनीत नाेकरी करत आहे. मार्च 2022 ते जुलै 2022 यादरम्यान तिची आराेपी साेबत शादी डाॅट काॅम या वेबसाईटवर ओळख झाली हाेती. त्यानंतर दाेघात चांगल्याप्रकारे ओळख झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले हाेते. परंतु लग्नापूर्वी कुंडली दाखविण्याचा कार्यक्रम झाला असता, कुंडलीत दाेष असल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. यामुळे कुणाल सिंग याने राग धरुन तरुणीकडे लैंगिक गाेष्टीची मागणी करुन तिला मारण्याची धमकी दिली. तसेच तिने लग्न करण्यास नकार दिला असतानाही त्याने तिचा पाठलाग करुन इन्स्टाग्रामवरुन तिचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांना तिची बदनामी हाेईल अशाप्रकारचे मेसेज पाठविले. त्यामुळे याबाबत तरुणीने चिखली पाेलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली असून पाेलीस आराेपीचा शाेध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...