आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीपटूचा मृत्यू:जोर मारताना हृदयविकाराच्या झटक्याने महाळुंगेच्या तरुण कुस्तीपटूचा मृत्यू

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळशी तालुक्यातील महाळुंगे गावचा रहिवासी असलेला कुस्तीपटू स्वप्निल पाडाळे (२८) हा बालेवाडी येथे मुलांसाेबत व्यायाम करत असताना बुधवारी सकाळी सहा वाजता त्यास हृदयविकाराचा झटका आला. जाेर मारल्यानंतर तो बसला तेव्हा त्याला अचानक घाम सुटला. ताे बेशुद्ध पडला. दरम्यान त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वी मृत्यू झाला. पाडाळे हा अविवाहित हाेता. त्याच्या पश्चात आईवडील व एक छाेटा भाऊ असा परिवार आहे. त्याचे आईवडील शेती करून उदरनिर्वाह करतात. स्वप्निल ३ वेळा महाराष्ट्र चॅम्पियन होता. कात्रजच्या मामासाहेब माेहाेळ कुस्ती संकुलात झालेल्या एनआयएस कुस्ती प्रशिक्षक परीक्षेत ताे राज्यात प्रथम क्रमांकाने पास झालेला हाेता.

बातम्या आणखी आहेत...