आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई सन्मान दिन:राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेकडून त्रिवेणी संगम, श्यामची आई बंधुता पुरस्काराचे वितरण

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशनच्या वतीने 25 सप्टेंबर हा दिवस 'आई सन्मान दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त 'त्रिवेणी संगम' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते त्रिवेणी संगमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे यांनी दिली.

बंधुता काव्य संमेलन

रोकडे म्हणाले,प्रसिद्ध कवी शंकर आथरे लिखित 'द्वारका' कादंबरीचे प्रकाशन, 'श्यामची आई बंधुता पुरस्कार' वितरण आणि 'माझी आई' बंधुता काव्य संमेलन असा हा त्रिवेणी संगम असणार आहे. शिवाय, साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. संगीता बर्वे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

यांची उपस्थिती

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनुसयाबाई आथरे (नाशिक), सीताबाई कदम (बीड), प्रकाशक प्रा. चंद्रकांत वानखेडे आदी उपस्थित राहणार आहेत.

यांचा होणार गौरव

अकरा आदर्श माता-पुत्रांचा 'श्यामची आई' हा बंधुता पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये अशोक आणि सीताबाई कदम (बीड), विद्या आणि रंजनाताई पाचंगे (पुणे), विनोद आणि कांताबाई गलांडे पाटील (पुणे), नारायण आणि वेणूबाई खेडकर (पाथर्डी), भैरू आणि राजूबाई कांबळे (बीड), रवींद्र आणि सुलोचना यशवंतराव (मुरबाड), अनुप्रिया आणि मेधा जोगळेकर (तळेगाव), गोरखनाथ आणि शालूबाई लामखडे (निघोज), गोपाळ आणि शरणाबाई कांबळे (पुणे), अभ्युदय आणि प्रमिला वाघमारे (चिखली), गणेश आणि फुलाबाई केदारी (सांगवी) यांचा समावेश आहे.उत्तरार्धात होणाऱ्या 'माझी आई' या बंधुता काव्यसंमेलनात संतोष शेळके (नेरळ), अनिल काळे (हिंगोली), सचिन शिंदे (उमरखेड), पल्लवी पतंगे (मुंबई), मधुश्री ओव्हाळ (पुणे), सुमन आव्हाड (पुणे), उदय क्षीरसागर (भिवंडी), नरेंद्र पाटील (धुळे), वैशाली माळी (कोल्हापूर), विजय माळी (धुळे) आणि जयश्री शेहणकर (अमरावती) हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...