आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील आगामी छावणी परिषदेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष ताकदीने उतरणार असून सर्व जागांवर उमेदवार निवडणुक लढवणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे व राज्य संघटक विजय कुंभार यांनी पुण्यात दिली.
विजय कुंभार म्हणाले, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयाेजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली राज्याच्या विकासाच्या माॅडेलची संपूर्ण जगभरात चर्चा हाेत आहे. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील जनतेला माेफत शिक्षण, आराेग्य, पाणी व स्वस्त वीज आदी सुविधा व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हवे आहे.
ताकदीने उतरणार
राज्यातील विविध महानगर पालिका क्षेत्रातील बऱ्याच शहरात छावणी परिषदेच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरीस हाेणार आहे. छावणी परिषदेच्या माध्यमातून छावणी परिसरातील अनेक विकासकामे करण्याची संधी असते. तसेच छावणी परिषद सदस्य एक प्रकारे नगरसेवकच असताे. त्यामुळे आम आदमी पार्टी या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याची घाेषणा पक्षाचे राज्य संयाेजक रंगा राचुरे यांनी ही केली आहे.
ज्या शहरात छावणी परिषदेच्या निवडणुक आहे तेथील पक्ष कार्यकर्त्यांनी, इच्छुकांनी शहर प्रभारी अथवा कार्याध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष पुणे कॅन्टाेनमेंट बाेर्ड व खडकी काॅन्टेन्मेंट बाेर्डाच्या निवडणुका लढणार आहे, अशी माहिती पक्षाचे पुणे शहराद्यक्ष डाॅ. अभिजीत माेरे यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.