आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे शहराचा इतिहास लवकरच सह्याद्री वाहिनीवर:‘आपलं पुणं' मालिकेचे रविवारपासून होणार प्रक्षेपण

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहराचा इतिहास आता लवकरच सह्याद्री वाहिनीवरून उलगडणार आहे. ‘दूरदर्शन, पुणे’ निर्मित ‘आपलं पुणं’ ही मालिका येत्या रविवारपासून (ता. 28) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे.

परदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या मराठी व्यक्तींचा प्रवास ‘ग्लोबल मराठी’ या नावाने सोमवारपासून (ता.29) प्रसारित होणाऱ्या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत दिली माहिती

दूरदर्शन आणि आकाशवाणी, पुणेचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजित बागल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन, युवा संशोधक आणि लेखक अश्विन चितळे, सूत्रसंचालक पूजा रायबागी, निर्माते मुजम्मिल पटेल उपस्थित होते.

रविवारी होणार प्रक्षेपण

‘‘सुमारे 50 हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीच्या खुणा पुण्यामध्ये सापडल्या आहेत. तत्कालीन पुण्यापासून ते आज आय. टी आणि मेट्रोच्या पुण्यापर्यंतची वाटचाल आणि त्यासह पुण्यातल्या महत्वाच्या वास्तू, व्यक्ती, पुण्यावर आलेली संकटे, पुणेकरांनी त्यावर केलेली मात, इथे घडलेले महत्वाचे प्रसंग या सर्वांचा मागोवा ‘आपलं पुणं’ या मालिकेत घेतला जाणार आहे. दर रविवारी सायंकाळी 6.30 वाजता या मालिकेचे प्रक्षेपण होणार आहे. डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. श्रीकांत गणवीर, डॉ. उदय कुलकर्णी, पांडुरंग बलकवडे, डॉ. अविनाश सोवनी, डॉ. श्रीनंद बापट आदी तज्ञांचे मार्गदर्शन आणि सहभाग यामध्ये असेल, असे पटवर्धन यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती नोकरी-व्यवसायानिमित्त जगातल्या विविध देशांमध्ये वास्तव्याला आहेत. मुलाखतींद्वारे त्यांची यशोगाथा ‘ग्लोबल मराठी' संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी’ या मालिकेतून उलगडणार आहे. दर सोमवारी रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे’’, असे बागल यांनी सांगितले. परदेशस्थ मराठी मंडळींशी संवाद साधला आहे तो विराज सवाई, मृणालिनी जोशी, विद्यागौरी ताम्हनकर, इंद्रायणी दुदगीकर यांनी. जगभरातील विविध देशात कामानिमित्त वास्तव्यास असणार्या मात्र, आपल्या कर्तृत्वाने महत्त्वाचे योगदान देणार्यांचा परिचय या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना होईल, असे पटेल म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...