आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Aarape Ridiculous To Overthrow Jharkhand Government Chandrasekhar Bavankule; Role Played By A Senior BJP Leader; News And Live Updates

आमदार खरेदी प्रकरण:झारखंड सरकार पाडण्याचे अाराेप हास्यास्पद - चंद्रशेखर बावनकुळे; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मांडली भूमिका

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाहक राईचा पर्वत केल्याचा प्रकार

झारखंड सरकार पाडण्याच्या भूमिकेत माझे नाव गाेवणे अाणि अाराेप करणे हास्यास्पद अाहे. मी कधी झारखंडला गेलेलाे नाही. झारखंडची राजधानीही पाहिलेली नाही किंवा तेथील काेणत्याही अामदाराचा फाेन क्रमांक माझ्याकडे नाही. मी राष्ट्रीय नेता नसून महाराष्ट्रातील छाेटा नेता अाहे व पक्षाचा महासचिव म्हणून काम पाहत अाहे. त्यामुळे मी झारखंड सरकार पाडणार होतो, असा अाराेप करणे चुकीचे अाहे, असे मत माजी मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

बारामती येथे अाेबीसी अारक्षण कृती समितीतर्फे आयोजित “ओबीसी एल्गार महामोर्चा’ नंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. या वेळी महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, योगेश टिळेकर, अॅड.प्रदीप गावडे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, झारखंडच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले अाहे की, सरकार पाडण्याचे अाराेप खाेटे असून काँग्रेसचे काेणतेही अामदार भाजपच्या संपर्कात नाहीत. तसेच अामच्या काेणत्याही अामदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केलेला नाही. या पद्धतीने राजकारणात अफवा पसरवून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक मला अाणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत अाहे. बारामती मधून अाेबीसी अारक्षणाबाबत एल्गार पुकारला गेला ताे महत्वपूर्ण अाहे.

एल्गार पुकारणारे राजकीय कार्यकर्ते नसून सामाजिक कार्यकर्ते अाहे. सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे राज्याचा अाेबीसींचा डेटा तयार करावा. डेटा तयार करण्यास तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लागत नाही, हे मराठा समाजाचा डेटा तत्काळ तयार गेला यावरून पाहिले अाहे. सुप्रीम कोर्टाने अारक्षण थांबवलेले नसून डेटा तयार करून कायदेशीर अारक्षण द्या, असे सुचवले अाहे. अाम्ही राजकारण करणार नाही. परंतु सरकारने कोर्टाच्या निकालाप्रमाणे काम करावे. सरकारने अाेबीसींचा बारामती मधील अांदाेलनाचा उद्रेक लक्षात घेऊन डिसेंबरपर्यंत अाेबीसींना अारक्षण द्यावे, अशी अामची मागणी अाहे.

...तर बावनकुळेंचे तिकीट का कापले असते ः चरणसिंग ठाकूर
नागपूर| झारखंड आमदार खरेदी प्रकरणात बाेरीला बोकूड लावण्यात येत आहे. दुरान्वये संबंध नसताना माझे व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव गोवण्यात येत आहे. बावनकुळे यांचे पक्षात इतके वजन राहिले असते तर त्यांचे स्वतःचे तिकीट कापले गेले नसते. आमच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत, अशी माहिती या प्रकरणात नाव येत असलेले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी दिली. अकारण तमाशा केला जात आहे, असे ठाकूर म्हणाले.

दिल्लीतील द्वारका भागातील हाॅटेल विवांतामध्येच मी, चंद्रशेखर बावनकुळे व व्यावसायिक जयकुमार बेलखेडे असे तिघे थांबलो होतो. पण, त्याचा झारखंडमधील आमदार खरेदीशी दुरान्वयेही संबंध नाही. याबाबत नाहक राईचा पर्वत करण्यात येत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. जयकुमार बेलखेडे हे काटोलमधील एक व्यावसायिक आहेत. ते सैनिकीपूर्व प्रशिक्षण देणारी शाळा चालवतात. त्यांना बोकारोला एक खाण खरेदी करायची होती, म्हणून तेही आमच्यासोबत होते, असे ठाकूर यांनी सांगितले. चौकशीसाठी पोलिस येऊ द्या वा एसआयटी येऊ द्या. घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यातून सत्य काय ते उघड होईल. हाॅटेलमध्ये कोणाशीही बोललाे नाही. जबाबदारीच द्यायची तर ती महाराष्ट्रातील देतील ना, असेही ठाकूर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...