आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम संबंधातून दुकानदाराचे अपहरण:पुण्यातील प्रकार, संशयित आरोपीला राजस्थानमधून अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबधातून दुकानदाराचे जबरदस्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणी आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे.

कैलासराम सोहनलाल जाट (वय - 35, रा. पाली, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. त्याचे साथीदार तिकाराम खोत, भंवर जाखड, गाविंद (सर्व रा. जालोर, राजस्थान) यांचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

फिर्यादी यांचे मांजरी येथे दुकान आहे. 23 नोव्हेबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघे जण दुकानात आले. खरेदीचा बहाणा करुन त्यांनी मारहाण करत बोलोरो गाडीतून त्यांना पळवून नेले होते. वाटेत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वसई विरार टोलनाक्याजवळील जंगलात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सोडून ते निघून गेले होते. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास केल्यावर त्यातील एक संशयित राजस्थानातील पाली येथे असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास पथकाने पाली येथे जाऊन कैलासराम जाट याला पकडले. त्यातून अपहरणामागील कारण स्पष्ट झाले. फिर्यादी यांचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहे. या तरुणीचे नातेवाईक राजस्थानमध्ये राहतात. त्यांना याची माहिती मिळाली. त्यातून आरोपी केरळ येथून पुण्यात आले. त्यांनी फिर्यादी याचे अपहरण करुन पुढे वसई जवळ सोडून दिले व त्यानंतर ते राजस्थानला निघून गेले होते.

प्रकरणाचा तपास सुरू

ही कामगिरी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांच्या पथकाने केली. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...