आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:प्रेमप्रकरणातून युवकाचे अपहरण; दोघे अटकेत

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. युवकाचे अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी करण शंकर माळी (१९, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तन्मय दिपक पाचरणे (२०, रा. पाचरणे आळी, वाघोली), वेदांत महादेव गपाट (१९, रा. शंकरनगर, खराडी) यांना अटक केली. करणने संगणकविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

बातम्या आणखी आहेत...