आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठ परीक्षा:परीक्षा विभागाच्या सावळ्या गोंधळाच्या विरोधात अभाविपचे शिट्टी आंदोलन

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज अभाविप पुणे शाखेच्या वतीने परिक्षा विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिट्टी बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परिक्षा विभागाच्या इमारती बाहेर निदर्शने केली.

कोरोना महामारी च्या नंतर प्रथमतः च ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा अजूनही विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या नाहीत. बऱ्याच अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक ही अद्याप जाहीर झाले नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांना परीक्षा तोंडावर आलेली असताना देखील अद्यापही प्रश्नसंच मिळाले नाहीत. विद्यापीठाच्या पोर्टल च्या निगडित देखील अनेक समस्या जाणवत आहेत. अशा अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी विद्यापीठातील संबंधितांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र, त्या प्रश्नांचे विद्यापीठाकडून काही तोडगे काढण्यात आले नाहीत. या कारणाने, विद्यापीठाचे या गंभीर परिस्थिती वर लक्ष पुन्हा वेधून आणण्यासाठी विद्यार्थी परिषदेने आज दि 20 जूनला विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या इमारतीसमोर आक्रमक आंदोलन केले.

वेळोवेळी विद्यापीठांनी विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले आहेत. परंतु, परीक्षा लांबणीवर असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोबत, त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया चालले आहे असे मत या ठिकाणी अभाविप पुणे महानगराचे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांचे पुढील सत्र या वेळात सुरू व्हायला हवे, त्या वेळात आधीच्याच सत्राची परीक्षा देऊ शकत नाहीत, ही अपेक्षा पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून नाही. कोरोना महामारी मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून ही अशी दिरंगाई परीक्षा विभागाकडून होणे हे अतिशय लज्जास्पद आहे, असे मत आंदोलनाचा समारोप करताना अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी मांडले.

यावेळी माननीय परिक्षा संचालक निवेदन घेण्यासाठी आले असता विद्यार्थी कार्यकर्त्यांची परिक्षा वेळापत्रका संबंधित च्या मागणीकडे लक्ष देता, वेळापत्रक विद्यार्थ्यांसमोर जाहीर केले. तरी, संचालकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या परिक्षा जर झाल्या नाहीत, तर विद्यार्थी परिषद या पेक्षा अधिक तीव्रतेने आंदोलन करेल, असा इशारा विद्यार्थी परिषदेने या आंदोलनाच्या शेवटी दिला.

-----

बातम्या आणखी आहेत...