आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएसीचा निर्णय:दिव्यांग, अनाथ, आर्थिक दुर्बल आणि अमागास उमेदवारांसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिव्यांग, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक तसेच अमागास उमेदवारांसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द केली आहे. संधीची मर्यादा घातल्यामुळे विद्यार्थी वर्गात संभ्रम होता. तो दूर झाला आहे. यापुढील सवर्च परीक्षांमध्ये ज्या-त्या प्रवर्गातील वयोमर्यादेच्या आधीन राहुनच विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. परिणामी आयोगाने संधीची मर्यादा रद्द केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळणार आहे. या निर्णयाचे स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

आयोगाचे ट्विट

''आयोगाने संधीची मर्यादा रद्द केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळणार आहे. आयोगाच्या या निर्णयाचे विद्यार्थी स्वागत करत आहेत. संधीची मर्यादा घातल्यामुळे विद्यार्थी वर्गात संभ्रम होता. तो दूर झाला असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहिला मिळत आहे. उमेदवार यांचे परीक्षा संधी रद्द झाले असली तरी पण वयोमर्यादा मध्ये कसलाच बदल झालेला नाही.''

- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष,एमपीएससी समन्वय समिती

बातम्या आणखी आहेत...