आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता विश्वास कोणावर ठेवायचा?:सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम बापाला अटक

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून बाप - लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील सावत्र बापानेच 11 वर्षाच्या सावत्र मुलीवर राहत्या घरात अत्याचार व जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी 32 वर्षीय सावत्र बापास अटक केल्याची माहिती साेमवारी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत पीडित मुलीच्या 23 वर्षीय आईने पोलिसांकडे पती विराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सावत्र बापावर बलात्कार, विनयभंग आणि पाेक्साे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नऊ नाेव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारदार महिलेने आराेपीशी दुसरा विवाह केला आहे. ते दत्तवाडी परिसरात एकत्रित राहत असताना, दुसऱ्या पतीने 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला तसेच तिच्याशी वेळाेवेळी घाणेरडे अश्लील चाळे केले. याबाबतची माहिती मुलीने आईला दिल्यानंतर, आईने तात्काळ पोलिस ठाणे गाठत पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहे.

भाडेकरुकडून मालकीणीचा विनयभंग

पुण्यातील धनकवडी परिसरात एका घरात भाडेकरु म्हणून राहणाऱ्या भाडेकरु इसमाने 43 वर्षीय घरमालकीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी आराेपी शशिकांत हनुमंत लाेखंडे (वय-45) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी साेमवारी दिली. तक्रारदार महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या फ्लॅट मध्ये राहत असलेला आराेपी जानेवारी 2019 पासून त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहत हाेता. भाडयाचे पैसे मागण्यासाठी त्या गेल्या असताना, आराेपीने मला तुमच्याशी बाेलायचे आहे असे म्हणून महिलेस टेरेसवर नेऊन ‘मी तुला सांभाळताे असे म्हणत जवळ ओढुन अंगास वेगवेगळया ठिकाणी स्पर्श करुन कपडे काढू लागल्याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. महिलेने याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचे सांगताच आराेपीने त्यांना वाईट शिवीगाळ करुन धमकी देऊन, तुझ्या मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

दाेन अल्पवयीन बहीणींचा विनयभंग

किराणा दुकानात घरातील सामान आणण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय आणि 13 वर्षीय दाेन मुलींना घराजवळ राहणाऱ्या एका तरुणाने रस्त्यात अडवले. सदर मुलींचा रस्ता आडवून त्यांना माेबाईल नंबर मागून मुलींनी नंबर देण्यास नकार दिला असता, एका मुलीची ओढणी ओढून जवळ मिठी मारली. मुलीने विराेध केला असता, तिचे कानाखाली मारली व दुसऱ्या मुलीचे देखील कानाखाली मारुन तिला दुखापत करुन दाेन्ही मुलींची छेड काढून जवळीक साधून त्यांचेसाेबत लैंगिक व अश्लील चाळे केल्याने आराेपी तरुणा विराेधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित मुलींच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आदित्य शिंदे (रा,पुणे) आरोपी विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...