आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन:पेपरफुटी, निकालातील गोंधळप्रकरणी 'अभाविप'चा कुलसचिवांना घेराव

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022 च्या उन्हाळी सत्र परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये विविध विद्या शाखांचे पेपर फुटल्याचे निदर्शनास आले. या विषयाबाबत अभाविपणे मागील आठवड्यात आंदोलन केले होते.

संबंधित महाविद्यालय, प्राध्यापक, इतर कर्मचारी तसेच विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक असणारे डॉ. अजितसिंह जाधव यांच्या वर समिती बसून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली होती, परंतु त्यावर कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे आज विद्यार्थी परिषदेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागले.

विविध विद्याशाखांचे निकाल लागत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अनेक विद्यार्थी हे पेपरला हजर असून देखील ऑनलाइन निकालामध्ये गैरहजर दाखवले गेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांना पेपर बरोबर लिहून सुद्धा शून्य गुण मिळाले आहेत, तर काही विद्यार्थ्यांना समान गुण मिळून त्यातील एक विद्यार्थी पास तर दुसरा नापास असे देखील प्रकार घडलेले अभावीपच्या निदर्शनास आलेले आहे.

बहुतांश विद्यार्थी हे पदवी नंतर पुढे प्रवेश घेण्याच्या तयारीत असताना विद्यापीठ व परीक्षा विभागाच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन डिस्क्रिप्टइव्ह पद्धतीने पेपर घेतले असून फक्त शिवाजी विद्यापीठाने ऑफलाईन MCQ पद्धतीने पेपर घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालात हा गोंधळ निर्माण झाला आहे. विधी शाखेच्या इंटेलेकच्युअल प्रॉपर्टी राईट्स (IPR) या विषयाच्या पेपरची काठिण्य पातळी जास्त असल्याचे सांगून विद्यापीठाने हा पेपर जवळपास एक महिन्यानंतर घेतला पण प्रत्यक्षात हा पेपर फुटलेला होता. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागला आहे, या विषयाची दखल राज्यपालांनी देखील घेतली आहे. अनेक विद्याशाखांचे निकाल लागून एक महिना होत आला असून अद्यापही त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल विद्यापीठाने जाहीर केलेला नाही.

अभावीपच्या मागण्या

  • ज्या विद्यार्थ्यांच्या निकलामध्ये त्रुटी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरता विद्यापीठाने ग्रेव्हीअन्स लिंक उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून एकही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही.
  • ज्या विद्यार्थ्यांना निकलामध्ये मिळालेले गुण समाधानकारक वाटत नाही किंवा शंका वाटते, अशा सर्व विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकन व फोटोकॉपीची सोय विद्यापीठाने उपलब्ध करून द्यावी.
  • जे विद्यार्थी हजर असून देखील ऑनलाइन निकालामध्ये गैरहजर लिहून आलेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे निकाल तात्काळ दुरुस्त जाहीर करावे.
बातम्या आणखी आहेत...