आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर बंद पडलेल्या ट्रकवर खासगी बस मागून धडकून झालेल्या अपघातात पोलिस शिपायासह चार जणांचा मृत्यू झाला. यात २० प्रवासी जखमी झाले आहेत. पुणे शहर पोलिस दलामध्ये सायबर सेलमध्ये कार्यरत नितीन शिंदे (३६, रा. हडपसर पुणे), आरती बिराजदार (२५्, रा.पुणे), अमित कलशेट्टी (२०, रा. सोलापूर), गणपत पाटील (५५, रा. कात्रज) अशी मृतांची नावे आहेत.
बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी पहाटे साडेचार ते पावणे पाचच्या सुमारास हा अपघात चौफुलीजवळ वाखारी गावच्या हद्दीमध्ये झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यवत पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर यवत पोलिसांनी जखमींना केडगाव चौफुला व लोणी येथील विश्वराज रुग्णालयात तातडीने हलवले.
पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू पोलिस नाईक शिंदे हे सोलापूरहून पुण्याकडे घरी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांना काळाने गाठले. ते पोलिस नाईक या पदावर हडपसर ठाण्यात कार्यरत होते. ते एक उत्कृष्ट खेळाडू होते. ॲथलेटिक्स प्रकारात ते उत्कृष्ट रनर होते. शिंदे यांच्या जाण्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुली संस्कृती (१३ ) व गिरिजा (११) असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.