आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्यापक महिलेचा मृत्यू:पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील दुर्घटना; संशयित डंपरचालकावर गुन्हा दाखल

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्यापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (29 जुलै) सकाळी नऊ वाजता सिंहगड भागात घडली. या अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. वृषाली तुषार थिटे (वय 38) असे मृत झालेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे.

डंपरचालक पसार

अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून त्याच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपरचालक घटनास्थळी डंपर सोडून पसार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहे. अशी माहिती सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी दिली.

पहाटे झाला अपघात

थिटे नऱ्हे परिसरातील नामांकित झील एज्युकेशन महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. शुक्रवारी (29 जुलै) सकाळी नऊच्या सुमारास त्या दुचाकीवरुन महाविद्यालयात जात होत्या. वडगाव बुद्रुक परिसरातील शिंदे मैदानाजवळील रस्त्यावर भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या प्रा. थिटे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

डंपरच्या धडकते शाळकरी मुलीचा मृत्यू

इंदापूर तालुक्यात काटी या गावाच्या परिसरात एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एका शाळेत जाणाऱ्या मुलीचा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत मुलीचे वडील जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तृप्ती कदम (वय 14) असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. नाना कदम असे जखमी झालेल्या तिच्या वडिलांचे नाव आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ट्रक (एम-एच 42 टी 1653) हा खडी भरून चाललेला ट्रक पेटवून देत निषेध केला. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी विनोद महादेव गवारे (वय 40 रा. यवतमाळ )या आरोपीस अटक केली आहे. अशी माहिती इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...