आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात:अपघातानंतर तासभर कारमध्येच अडकला चालक; मागे बसलेल्या डॉक्टरांनी वाहनातच सुरू केले उपचार, बचाव पथक येईपर्यंत ठेवले शुद्धीवर

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मर्सेडीज कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर आदळली. या अपघातात चालक युवक तासभर कारमध्येच अडकला होता. अशात आयआरबी आणि पोलिसांसह सुरक्षा पथकाने त्याला गाडीतच धीर देऊन स्थिर ठेवण्यासाठी उपचार सुरू केले. यानंतर कसे-बसे त्याला कारमधून बाहेर काढण्यात आले.

अपघातानंतर सहप्रवासी डॉक्टरने वाचवला जीव
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर किवळे एक्झिट जवळ हा अपघात घडला. कार चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कार चालक ओंकार रोनडाळे गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर तो वाहनातच अडकला. त्याच्या मांडीत पत्रा शिरला. त्यामुळे मोठा रक्तस्राव सुरू झाला होता. अपघातात बचावकार्य करणाऱ्यांसह बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी झाली होती.

कारमध्ये सहप्रवासी डॉक्टर सुनील मेहता देखील होते. त्यांनी तातडीने मेडिकल किट काढून ओंकारवर उपचार सुरू केले. मोटारीत अडकलेल्या ओंकारला धीर देत सलाईन लावून इंजेक्शन सुद्धा दिले. लोखंडी पत्रा ओंकारच्या मांडीतून आर-पार झाला होता. बचाव पथक येईपर्यंत त्यांनीच ओंकारला शुद्धीवर ठेवले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर देवदूत यंत्रणा आणि आयआरबी, स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थाळी दाखल झाले. या सर्वांनी मिळून कारमध्ये अडकलेल्या तरुणाला बाहेर काढले. यात त्यांना दीड तास लागला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इनपुट - मोहन दुबे

बातम्या आणखी आहेत...