आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा:कास रोडवर पर्यटकांच्या गाडीला अपघात, वाहनचालकाचा ताबा सुटल्याने मिनीबस उलटली

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्लामपूर येथून आठ युवक बामणोली येथे पर्यटनासाठी सातारा येथे आले होते.

इस्लामपूर येथून बामणोलीला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या मिनीबसला अपघात झाला आहे. कास रस्त्यावर पिसानी गावाजवळ वळणावर पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समजली

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, इस्लामपूर येथून आठ युवक बामणोली येथे पर्यटनासाठी सातारा येथे आले होते. इस्लामपूर येथून पहाटेच्या सुमारास सातारा येथे पोहचल्यानंतर ते काही वेळ सातारा येथे थांबले होते. पुढील प्रवासासाठी निघालेल्या या मिनीबसमध्ये 10 युवकांचा समावेश होता. पहाटेच्या सुमारास बामणोलीकडे जाणार्‍या रस्त्यावर पिसानी गावाजवळ आल्यानंतर वळणावर हा अपघात आला. येथील वळणावर पहाटेच्या सुमारास मॉर्निंगवॉकसाठी चाललेल्या नागरिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात मिनीबसवरील चालकाचा ताबा सुटल्याने मिनीबस पलटी झाली. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात मिनीबसमधील 10 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...