आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात रिक्षा भाड्यात तब्बल 4 रुपयांची वाढ:पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालक 25 रुपये आकारणार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल आणि सीएनजीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली होती. त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा भाडे वाढीला मंजूरी दिली आहे. तब्बल 4 रुपयांनी ही भाडेवाढ झाली आहे. यामुळे सर्व सामान्य पुणेकरांच्या खिशाला झळ बसणार आहे. पहिल्या दीड किलोमीटर साठी 4 रुपये तर पुढच्या 1 किलोमीटर साठी तब्बल 3 रुपये आता आकारले जाणार आहे.

1 तारखेपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. नव्या दरवाढीनुसार पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालक 25 रुपये आकारनार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आकारले जाणार आहे. रिक्षा चालकांना पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे आकारणी करता येत होती. तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते.

रिक्षाची भाडेवाढ झाल्याने मीटर पुनः प्रमाणीकरने रिक्षा चालकांना बंधनकारक आहे. याची मुदत 31 ऑक्टोंबर आहे. जे रिक्षाचालक या मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण करणार नाहीत त्यांच्यावर 1 ते 40 दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल किंवा किमान 50 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर पासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षा धारकांकरिता ही नवी भाडेवाढ लागू राहणार आहे. हा निर्णय पुणे, पिंपरीचिंचवड आणि बारामती या शहरासाठी लागू राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...