आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात खळबळ:तडीपार गुंडाकडून सहाय्यक फौजदाराचा निर्घृण खून, आरोपी अटकेत

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवार पेठेतील श्रीकृष्ट टॉकीजजवळील घटना

वर्षभरापूर्वी तडीपार केलेल्या एका गुंडाने फरासखाना पोलिस ठाण्यातील फौजदाराचा सपासप वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ ही घटना घडली. या प्रकरणी गुंड प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे.

सहाय्यक फौजदार समीर सय्यद
सहाय्यक फौजदार समीर सय्यद

सहाय्यक फौजदार समीर सय्यद (वय 48) असे खून झालेल्या पोलिसाचे नाव आहे, तर प्रवीण महाजन या तडीपार गुंडाने हा खून केला आहे. महाजन याला एका वर्षापूर्वी तडीपार केले होते. तरीही तो शहराच्या मध्यवस्तीमध्ये आला होता. समीर सय्यद हे काम संपवून खडक पोलिस लाइनमधील राहत्या घराकडे जात असताना श्रीकृष्ण टॉकीज जवळ महाजनने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आरोपी प्रवीण महाजनला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...