आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने नवविवाहित २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. तरुणीचे अश्लील फाेटाे तिच्या पतीस पाठवून तिची बदनामी करण्यात आली. याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पाेलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली आहे.
अविनाश पांडुरंग करगळ (२६, रा.चांदोर, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अविनाश करगळ व तरुणी औरंगाबाद येथे एमसीएचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर एमसीएच्या तीन महिन्यांच्या इंटरर्नशिपसाठी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी हिंजवडीत एका कंपनीत गेले होते. यात दोघांचाही सहभाग होता. काही दिवसांपूर्वी आरोपीने तरुणीला वाकडच्या एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिच्यासाेबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. दोघांचे अश्लील फाेटाे मोबाइलमध्ये काढले. ते फाेटाे पीडित तरुणीच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.