आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवत पाेलिस ठाण्याच्या हद्दीत 27 जुलै राेजी पालखी तळावरील माेकळया मैदानात पाेलिसांना संजय सखाराम बनकर (रा.तांबेवाडी, खामगाव, ता.दाैंड,पुणे, मु,रा. मुराराजी पेठ, साेलापूर) या इसमाचा काेणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने छातीवर व छातीच्या खालील बाजूस वार करुन निघृण खून केलेला मृतदेह मिळाला हाेता.
पाेलिस तपासात सदर खून हा मयत व्यक्तीने दारु पिऊन शिवीगाळ करत मारहाण केल्याने एका इसमाने केल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. सदर गुन्हयातील आराेपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेष्ण शाखेने (एलसीबी) व यवत पाेलिसांनी बेडया ठाेकल्या आहे.
राजबहादुर बालुसिंग ठाकुर ऊर्फ राजु सारखी (वय-47,रा.यवत, ता.दाैंड,पुणे, मु.रा.पहाडीपुर, नेपाळ) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. सदर खुनाचा गुन्हा घडल्यानंतर पाेलिस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी आराेपीच्या तापासासाठी चार पथके तयार केली हाेती. तपास पथकातील पाेलिस निरीक्षक नारायण पवार, पाेलिस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, सचिन घाडगे, केशव वाबळे यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आराेपी दाैंड रेल्वे स्टेशन येथुन नेपाळला पळून जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी दाेन दिवस दाैंड रेल्वे स्थानाकावर सापळा लावला हाेता. सहा ऑगस्ट राेजी मध्यरात्री आराेपी दाैंड रेल्वे स्थानाकावर आला असता, पोलिसांनी सापळा रचून आराेपीस ताब्यात घेतले. एलसीबीचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशाेक शेळके म्हणाले की, आराेपीच्या चाैकशीत त्याने सांगितले की, यवत येथे पालखी तळावर मी बसलाे असताना, एका इसमाने दारु पिऊन मला शिवीगाळ केली व माझ्या कानाखाली चापट मारली. त्यामुळे मी चिडून जावून त्या इसमाच्या पाेटात चाकु मारुन त्याचा खून केला आहे. पोलिसांनी आराेपीस शनिवारी न्यायालयात हजर केले असता आराेपीला 11 ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. याबाबत पुढील तपास यवत पाेलिस करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.