आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीस कोण जबाबदार:सरकारची परवानगी न घेता चार वर्षे उरवडेच्या कंपनीत उत्पादन; आरोपी निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उरवडे घटनेत मृतदेह खाक झाल्याने केवळ सांगाडे अग्निशमन दलास सापडले.

उरवडे येथील एसव्हीएस अॅक्वा टेक्नाॅलॉजी कंपनीत रसायनांचा स्फाेट हाेऊन लागलेल्या अागीत १७ जणांचा हाेरपळून मृत्यू झाला. क्षमतेपेक्षा अधिक रसायनांचा साठा कंपनीत विनापरवानगी ठेवल्याने अागीची तीव्रता वाढल्याचे पाेलिसांनी न्यायालयात सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे राज्य सरकारची परवानगी न घेताच २०१६ ते २०२० अशी चार वर्षे उत्पादन अाणि व्यवसाय केल्याचे उघडकीस अाले.

दरम्यान, कंपनीचे मालक निकुंज बिपिन शहा (३९) यास न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. गणपा यांनी अाराेपीस १३ जूनपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले. याप्रकरणी निकुंज शहासह त्याचे वडील बिपिन जयंतीलाल शहा (६८, रा. सहकारनगर, पुणे) व भाऊ केयूर शहा (४१, रा. दुबई) यांच्यावर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

सरकारी वकील नीलेश लडकत यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, या घटनेत १७ मृत झाले असून चार जण जखमी झाले. कंपनीत अनधिकृत सॅनिटायझर साठा माेठ्या प्रमाणात केल्यास कंपनीला अाग लागू शकते व त्यामुळे कामगारांचा जीव जाऊ शकताे याची पूर्वकल्पना असतानाही कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययाेजना करण्यात अाल्या नाहीत. कंपनीने उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल किती, काेणता व काेठून अाणला याचा तपास करायचा अाहे. अाैद्याेगिक सुरक्षा व आराेग्य विभाग यांनी दिलेल्या परवान्याव्यतिरिक्त ज्वालाग्राही पदार्थाचा साठा माेठ्या प्रमाणात करण्यात अाला हाेता.

सॅनिटायझर उत्पादनासाठी शासनाकडून परवाना घेण्यात अाला हाेता का ? यासंदर्भात तपास करणे बाकी अाहे. कंपनीने शासनाकडून काेणत्या उत्पादनाची परवानगी घेतली व ते किती प्रमाणात उत्पादन करत हाेते याची चाैकशी करायची अाहे. कंपनीत ज्वालाग्राही कच्चा माल साठवण्याचे ठिकाण व कामगारांची काम करण्याची जागा एकाच ठिकाणी असल्यामुळे माेठ्या प्रमाणावर रसायनांनी पेट घेऊन स्फाेट झाला अाहे.

पॅकिंग मशीनमुळे लागली अाग
उपविभागीय पाेलिस अधिकारी डाॅ. सई भाेरे पाटील म्हणाले, सॅनिटायझर साठा करण्याबाबत कंपनीने काेणतीही परवानगी घेतलेली नाही. अल्पावधीत अागीचा भडका उडाल्याने कामगारांना जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही. पॅकिंग करण्याच्या मशीनमधून स्पार्क उडून ताे प्लास्टिक व केमिकलवर पडल्याने अाग लागल्याचा अंदाज कंपनीतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. परंतु ज्या मशीनमुळे अाग लागल्याचे सांगण्यात येते त्यांची नेमकी स्थिती कशी हाेती याबाबत चाैकशी करणे बाकी अाहे.

डीएनएमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार नाहीत
उरवडे घटनेत मृतदेह खाक झाल्याने केवळ सांगाडे अग्निशमन दलास सापडले. पुण्यातील ससून रुग्णालयात सदर मृतदेहांचे सांगाडे ठेवण्यात आले असून मृतांच्या कुटुंबाचे डीएनए नमुने मंगळवारी घेण्यात आले. परंतु अद्याप डीएनए नमुन्यांचा अहवाल प्राप्त न झाल्याने पोलिसांना मृतदेह नातेवाईक, कुटुंबाच्या ताब्यात देता येत नाहीत, अशी कायदेशीर अडचण निर्माण झाली. मात्र, या घटनेला दोन दिवस होऊनही मृतांवर अंत्यसंस्कार करता येत नसल्याने कुटुंबीयांची अडचण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...