आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:बलात्कार केल्यानंतर मुलीचा खून करत 25 जखमा करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकतर्फी प्रेमातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एका तरुणास जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधिश माधुरी एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला. तरुणाने मुलीचे नाक, तोंड दाबून ठेवल्याने तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही आरोपीने कंपास पेटीतील करकटकाने तिच्या चेहऱ्यासह शरीरावर २५ ठिकाणी ओरखडे ओढून जखमा केल्या होत्या.

आकाश नाथा कोळी (१९, रा. पाषाण,पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पाषाण परिसरात शिकवणीवरून रात्री साडेसात वाजता मुलगी पायी घरी जातना ८ सप्टेंबर २०१२ रोजी हा प्रकार घडला. सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी १९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये नोडल ऑफिसर दत्ता अंगरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मुलगी घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पाषाण येथील डीएससी क्वार्टर्स येथील मोकळ्या मैदानावर मुलीचा मृतदेह सापडला.

आरोपीचे मुलीवर होते एकतर्फी प्रेम
कोळी याचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते. घटनेच्या दिवशी रात्री साडेसात वाजता शिकवणीवरून मुलगी घरी पायी परतत असताना रस्त्यात वाट पाहत उभ्या असलेल्या कोळीने मुलीस अडवले आणि तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, मुलीने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या कोळीने तिला ओढत बाजूच्या मैदानावरील झुडपात नेले. त्यानंतर नाक आणि तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता मुलीच्याच बॅगमधील करकटकने तिच्यावर २५ वार केले.

बातम्या आणखी आहेत...