आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील आरोपीला दिल्लीतून ठोकल्या बेड्या:ज्येष्ठाचा गुप्तांगावर हल्ला करुन हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नातेवाईक असलेल्या महिलेवर तिरकी नजर असल्याच्या संशयातून घराशेजारी राहणार्‍या ज्येष्ठाचा खून करून फरार झालेल्या मुळच्या मध्यप्रदेश येथील एकाला हडपसर पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने संशयातून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. असे जरी असले तरी पोलिसांनी केलेल्या तपासात खून झालेल्या व्यक्तीवर चुकीच्या पध्दतीने संशय घेतल्याचेही समोर आले आहे.

अरुण किसन सुर्यवंशी (वय-54, रा.मांजरी,पुणे, मु.रा.कर्नाटक) असे खून झालेल्याचे नाव आहे. पिताराम केवट (वय-23,रा.मांजरी,पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण सुर्यवंशी (वय 25) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना 15 ते 17 नोव्हेंबरला शेवाळेवाडी बसस्थानक परिसरात घडली.

अरूण आणि लक्ष्मण हे हडपसर परिसरातील मांजरी भागात नर्सरीत काम करत होते. आरोपी पिताराम केवट अरूण यांच्या शेजारी रहाण्यास होते. 15 नोव्हेंबरला पितारामने कामाचा बहाणा करीत अरुण सुर्यवंशी यांना घराबाहेर नेले. त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाल्याने पितारामने अरूण यांना मारहाण केली. त्यांच्या गुप्तांगला इजा करुन जीवे ठार मारले.

काही वेळाने तो पत्नीसह सर्व साहित्य घेऊन पसार झाला आहे. दरम्यान, वडील घरी न आल्याने लक्ष्मण यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना 17 नोव्हेंबरला अरूण यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक विश्वास डगळे, दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागले.

आरोपी हा दिल्ली येथे असल्याचे विश्लेषावरून निश्चित झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, संदीप राठोड, सुशील लोणकर, समिर पांडुळे यांच्या पथकाने कारवाई केली. अरोपीला पुणे येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 24 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...