आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणी 7 वर्षे सक्तमजुरी:अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला 7 वर्षे सक्तमजुरी, 1 लाखांचा दंड

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्‌सअप चॅटींगद्वारे ओळख झाल्यानंतर लग्नाच्या आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी शुक्रवारी (ता. 10) सुनावली.

दंडाची 75 टक्के रक्कम पीडितेला

दंडापैकी 75 हजार रुपये पीडितेला देण्यात यावेत, दंड न दिल्यास त्याला अतिरिक्त तीन महिने तुरूंगवास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पीडितेचे वय आणि आरोपीने निर्दयीपणे केलेल्या लैंगिक शोषणाचा विचार करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तीवाद सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यानी केला.

सहा साक्षीदार तपासले

आकाश गुलाब यादव (वय 21रा. शिवणे,पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीने हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड. चंद्रकिरण साळवी यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. 13 फेब्रुवारी ते 15 सप्टेंबर 2015 या कालावधीत त्याच्या घरी, एका दुकानात आणि डोणजे येथील एका लॉजवर ही घटना घडली.

व्हाॅट्सअपवरून झाली ओळख

पीडितेच्या मित्राकडून त्याने तिचा मोबाइल क्रमांक मिळविला. व्हॉट्‌सअपवर मॅसेज करून ओळख करून घेतली. लग्न आणि बदनामीच्या अमिषाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला. पीडितेने हा प्रकार घरी सांगितला. याबाबत घरच्या लोकांनी त्याला विचारणा केली. त्यावेळी "तुमची मुलगी मी वापरली, तुम्हाला करायचे ते करा ' असे बोलुन शिवीगाळ करून त्यांना घराबाहेर काढले. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून बलात्कार, मारहाण आणि धमकीच्या कलमानुसार दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने बलात्काराच्या कलमानुसार शिक्षा सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...