आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरातील घरात चोरी करताना मालक आल्यामुळे चोरटा घाबरुन पळून जात असताना खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाला. बेशुद्ध अवस्थेत त्याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, पोलीस कर्मचार्याची नजर चुकवून आरोपीने ससून रुग्णालयातून पलायन केले. ही घटना सहा मे रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वॉर्ड क्रमांक नऊमध्ये घडली आहे.
पोलीस अंमलदार प्रशांत तांगडकर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तांगडकर हे आळेफाटा पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. आळेफाटा परिसरात चोरी करताना घरमालक आल्याचे पाहून पळताना आरोपी पडल्याने बेशुद्ध झाला. त्या अवस्थेत चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर वॉडक्रमांक नऊ मध्ये उपचार सुरु होते. मात्र, आणखी उपचारासाठी त्याला वॉर्डक्रमांक ७४ मध्ये दाखल करायचे होते.
त्यासाठी तांगडकर हे एचओडी यांची सही घेण्यासाठी गेले होते. मात्र, ते हजर नसल्यामुळे फिर्यादी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी बाहेर गेले. नेमकी संधी साधून घरफोडीतील आरोपी पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक एस मधाळ पुढील तपास करीत आहेत.
टेम्पो चालकाच्या धडकेत पादचारी ठार
वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही टेम्पो चालवित एकाने पादचार्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. हा अपघात ३० एप्रिलला मार्वेâटयार्डातील गेटक्रमांक चारजवळ घडला अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
वसंत रामचंद्र अवघडे (वय ४५) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
टेम्पो चालकाकडे लायसन्स नसतानाही ३० एप्रिलला तो मार्वेâटयार्डात वाहन घेउन आला होता. त्यावेळी गेटक्रमांक चारजवळून रस्त्याने पायी जाणारे वसंत अवघडे यांच्यासह दोघांना त्याने धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या वसंतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.