आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी बेल्टने मारहाण नंतर बलात्कार!:लग्नाला नकार दिल्याने मैत्रिणीसोबत कृत्य; एकतर्फी प्रेमातून पुण्यात घडली धक्कादायक घटना

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रीनीने लग्नाला नकार दिल्याने तिला बाईकवर बसवून बाहेर नेत बेल्टने मारहाण करत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शकिल बागवान असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 22 वर्षीय पिडीतेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार 18 जून रोजी रात्री अकरा ते 19 जून रोजी दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीता आणि आरोपी बागबान हे एकमेकांचे मित्र आहेत.

संशयित आरोपीचे पिडीतेवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तीने लग्नास नकार दिल्याने त्याला राग आला होता. याबाबत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतरही तो तीची मनधरनी करण्यासाठी तिचा पाठलाग करून त्रास देत होता. मात्र, पिडीतेने त्याला दाद दिली नाही. पिडीने पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. याचा आरोपीला राग आल्याने त्याने पिडीतेला जिवे मारण्याची धमकी दिली.

18 जुन रोजी पिडीतेला दुचाकीवर बसवून बाहेर नेले. त्या ठिकाणी तीला बेल्टने मारहाण केली. एवढेच नाही तर तीच्यावर जबरदस्तीने वारंवार बलात्कारही केला. यानंतर तीला सोडून दिले. या घटनेनंतर पिडीता मानसिक तणावाखाली होती. तीने हडपसर पोलिस ठाणे गाठत बागवान विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बागबान हा फरार असुन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.