आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या मसाज सेंटरवर कारवाई

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील साळुंके विहार परिसरात एका स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच आराेपींविराेधात कारवाई करण्यात आली असून वेश्याव्यवसायातून ४ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. यात एक छत्तीसगड, एक पश्चिम बंगाल व दाेन महाराष्ट्रातील तरुणी आहेत. याप्रकरणी स्पा मॅनेजर झारणा ऊर्फ पिंकी गाैतम मंडल (२७, रा.काेंढवा, पुणे, मु.रा. पश्चिम बंगाल), सुमीत अनिल हाेनखंडे (२१, रा. काेंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. स्पा मालक रचना संताेष साळुंखे (रा. येवलेवाडी, पुणे), सार्थक लाेचन गिरमे (रा. वानवडी, पुणे) व लाेचन अनंता गिरमे (रा.पुणे) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस त्यांचा शाेध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...