आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जिल्ह्यात मंचर चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई:पुर्नवापरासाठी नियमांचे पालन आवश्यक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने मंचर येथील महावीर डेअरी आणि स्वीट मार्टने अस्वच्छ परिस्थितीत खवा व गुजरात बर्फी साठविल्यामुळे तसेच चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रे वर 'बेस्ट बिफोर' दिनांक नमूद केले नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती सोमवारी देण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने महावीर डेअरी अॅन्ड स्वीट मार्ट, मंचर या स्वीट मार्टवर धाड टाकून अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला खवा व स्वीट खव्याचे (गुजरात बर्फी) दोन नमुने घेऊन उर्वरित 23 हजार 800 रुपये किंमतीचा 119 किलो खवा आणि 5 हजार 600 रुपये किंमतीचा 28 किलो स्वीट खवा (गुजरात बर्फी) असा एकूण 29 हजार 400 किंमतीचा साठा जप्त केला. स्वीट खवा आणि गुजरात बर्फी ही साखर, दूध पावडर, खाद्यतेल आदी घटक पदार्थांपासून बनविण्यात आल्याचे लेबलवरुन स्पष्ट होते.

दोषी आढळल्यास मिठाई विक्रेत्यावर कारवाई

सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती 'बेस्ट बिफोर' दिनांक नमूद करावा व मिठाई बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करु नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खवा(गुजरात बर्फी) चा वापर करुन मिठाई बनवित असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी सांगितले आहे.

पुर्नवापरासाठी नियमांचे पालन आवश्यक

अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यावसायाचे परवाना व नोंदणी) नियमन 2011, अन्न सुरक्षा व मानदे (विक्रीसाठी मनाई व निर्बंध) नियमन 2011 व अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या वेळोवेळी प्राप्त आदेशानुसार खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे गरजेचे आहे. तसेच अखाद्य वापरासाठी वापर करताना आवश्यक अभिलेखा जतन करणे बंधनकारक आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी दिली आहे.

वापरलेल्या तेलाचा शक्यतो तळण्यासाठी एकदाच वापर करावा. तळलेल्या खाद्यतेलाचा पुर्नवापर करताना ट्रान्सफॅट तयार होणे टाळण्यासाठी जास्तीत जास्त 3 वेळेस वापर करावा. न वापरलेल्या तेलामध्ये 15 टक्केपेक्षा जास्त टोटल पोलर कंपाऊंड्स (टीपीसी) आढळता कामा नये. 25 टक्केपेक्षा जास्त टीपीसी आढळून आल्यास त्याचा पुर्नवापर करु नये.

बातम्या आणखी आहेत...