आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंमली पदार्थ विरोधी पथक एकने कोंढवा परिसरातून 8 लाखांचा 40 किलो 245 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपीकडून दुचाकी, मोबाइल असा ऐवज हस्तगत करण्यात आला. व्यंकट मनोहर सुर्यवंशी (वय 40 रा. भोसरी, मूळ-उमापुर,ता.बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, वाडेबोलाई परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक दोननी कारवाई करत चार लाख रुपये किमतीचा 21 किलो गांजा जप्त केला आहे. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विक्री करणार्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एकजण गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिस हवालदार विशाल दळवी यांना मिळाली. पथकाने सापळा रचून व्यंकट सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 किलोवर गांजा, दुचाकी, मोबाइल असा 8 लाख 65 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय शैलजा जानकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, सचिन माळवे, राहुल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, योगेश मोहिते यांनी केली.
गांजा तस्करी करणारे दोघे जेरबंद
अंमली पदार्थ विरोधी पथक दोनकडील पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे,पोउपनि दिगंबर चव्हाण व अंमलदार असे पुणे शहर हद्दीत अंमली पदार्थाचे गैरव्यवहार संबंधाने माहिती काढून कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना, पोलिस अंमलदार योगेश मांढरे व नितीन जगदाळे यांना माहिती मिळाली की, लोणीकंद पोस्टेहद्दीत वाडेबोलाई रोड जवळ सार्वजनिक रोडवर दोन इसम गांजा विक्री करीता येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विजय रमेश शेलार( वय 28 वर्ष राहणार , मु. पो.वराळे, ता. देवळा, जिल्हा नाशिक) आणि दीपक अशोक मोहिते (वय 21 रा. मु.पो. दळेगाव, ता. येवला जिल्हा नाशिक) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चार लाख 24 हजार रुपये किमतीचा 21 किलो 200 ग्रॅम गांजा आमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.