आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येतील संशयित सौरभ महाकालला अटक:बाणखेले खून प्रकरणातील मुख्य संशयित काळेला दिला होता आश्रय

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंचर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील ओंकार बाणखेले खून प्रकरणातील संताेष जाधव या आराेपीस आश्रय देणारा साैरभ ऊर्फ सिध्देश कांबळे ऊर्फ महाकाल यास पुणे ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज बेड्या ठोकल्या. सध्या गाजत असलेल्या पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याप्रकरणात संताेष जाधव याचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यातच संतोषचा साथीदार आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या साैरभ महाकाल याचाही सहभाग असल्याचे आता समोर येत आहे.

20 जूनपर्यंत कोठडी

साैरभ महाकाल यास न्यायालयात हजर करण्यात आले असता, 20 जूनपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती पाेलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. सदर मंचर येथील खुनाच्या गुन्ह्यात संताेष सुनील जाधव हा पसार हाेता. यानंतर त्याला साैरभ कांबळे याने आश्रय दिला हाेता.

याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाल्या नंतर पुणे -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अशाेक शेळके यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...